Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागून आहे. निवडणूक आयोग (Election Commission) येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
या बातमीनुसार इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने (Praveen Mane) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) रामराम ठोकून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. माहितीनुसार, उद्या (3 ऑगस्ट) रोजी प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे.
बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षात काम करण्यास सुरुवात केली होती मात्र त्यानंतर काही दिवसात त्यांनी त्यांची भूमिका बदलत अजित पवार गटात शामिल झाले होते. माहितीनुसार, त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रवीण माने यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रवीण माने यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती.मात्र आता पुन्हा एकदा ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
SC ST आरक्षण निकालाविरोधात गुणरत्न सदावर्ते घेणार न्यायालयात धाव, म्हणाले, पाकिस्तानमध्ये …
माहितीनुसार, शनिवार (3 ऑगस्ट) दुपारी चार वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये प्रवीण माने यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी माने यांनी अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. मात्र पुन्हा प्रवीण माने शरद पवार गटात प्रवेश केल्याने इंदापूरमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.