Former IAS officer Mahesh Zagade Exclusive : जॉन्सन अँड जॉन्सन या बलाढ्य औषध कंपनीच्या एका दोषयुक्त उत्पादनामुळे जगभरातील खुबा रुग्ण त्रस्त झाले. त्या विरोधात मग जगभर आवाज उठला. अनेक देशांनी या कंपनीला नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले. पण भारतात मात्र या साठी वेगळा संघर्ष करावा लागला. या संघर्षाची ठिणगी पेटवली ती निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने झगडे यांची लेट्सअप मराठीने खास मुलाखत घेतली आहे. लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी महेश झगडे यांना अनेक विषयांवर बोलत केलं आहे. त्यामध्ये झगडे यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याविषयीचा खास किस्सा सांगितला आहे.
देशभरात वाढत्या गुटखा, त्यामध्ये मावा, गोवा, अशा प्रकारचे अनेक पदार्थ विकले जात होते. त्यामुळे कर्करोगाचे अेक पेशंट वाढत असल्याचं लक्षात आल्याने तत्कालीन सनदी अधिकारी महेश झगडे यांनी गुटखा बंदी करण्यासाठी पाऊल उचललं होत. त्यावेळी अनेक कंपन्या, अधिकारी झगडे यांच्या विरोधात होते. मात्र, झगडे यांनी थेट कंपनीवरच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात झगडे यांचं आयुक्त पद जातय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, त्यांनी यामधून काही माघार घेणार नसल्याचं वारंवार सांगितलं होत.
मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव
या काळात पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री तर आर.आर. पाटील हे गृहमंत्री होते. झगडे यांनी जेव्हा गुटखा बंदीचा विषय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काढला त्यावेळी त्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना भेटा असं सांगितल होत. त्यावर झगडे हे पाटील यांनी भेटल्यावर त्यांनी बैठक लावण्यास सांगितली. ती बैठक झाल्यानंतर झगडे यांनी टाटा मेमोरीअल कॅंन्सर रुग्णालयात आपण याव असा आग्रह आर.आर.पाटील यांच्याकडं केला. तो मान्य करत पाटील रुग्णालयात गेले होते.
सरकारी लवाजमा नाही तर एका खासगी गाडीतून आर.आर. पाटील झगडे यांच्यासोबत रुग्णालयात गेले होते. त्यावेळी झगडे यांनी पाटील यांना कर्करोगाचे पेशंट दाखवले. अगदी वाईट अवस्थेत ते पेशंट असल्याने आर.आर.पाटील ते पेशंट काही जास्त पाहू शकले नाहीत अन् अर्ध्यातूनच ते म्हणाले चला आपण वापस जाऊ. माझ्याकडून हे काही पाहिल जाणार नाही. याचा मला त्रास होतोय. तुम्ही गुटखा बंदी करून टाका असं म्हणत आर.आर पाटील बाहेर पडले होते. या सगळ्या गोष्टी झगडे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितल्या आहेत.