Download App

भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन, पीएम मोदींसह शरद पवारांनी केला शोक व्यक्त

कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.

  • Written By: Last Updated:

Anshuman Gaikwad Passed Away : क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी ब्लड कॅन्सरशी प्रदीर्घ लढाईनंतर निधन झालं. (Anshuman Gaikwad) आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत गायकवाड यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 1983 मध्ये जालंधर येथे पाकिस्तानविरुद्ध 2 शतके आणि 201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 1154 धावा केल्या होत्या.

IND vs ZIM : भारतीय संघाचा विजयी चौकार, शेवटच्या T20 मध्ये झिम्बाब्वेला दिली 42 धावांनी मात

गायकवाड हे दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते. अंशुमन गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 40 कसोटी सामन्यांच्या 70 डावांमध्ये 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 10 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली. त्याचबरोबर त्यांच्या नावावर 2 विकेट्सही आहेत.

अंशुमन गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जलदगती गोलंदाजांसमोर पाय रोवून उभे राहात अंशुमन गायकवाड यांनी जगभरातल्या अनेक तेजतर्रार गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. यामध्ये त्यांनी थेट अंगावर अनेक गोलंदाजांचे वेगवान चंडू झेलले. यामुळे त्यांना अनेकदा जखमाही झाल्या. पण त्यांचा अभेद्य बचाव भेदणं वेगवान अनेक दिग्गज गोलंदाजांसाठी महाकठीण कर्म ठरलं.

श्रीलंकेला व्हाईट वॉश! सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय; श्रीलंकेचा 3-0 ने उडवला धुव्वा

अंशुमन गायकवाड हे त्यांच्या अभेद्य बचावासाठी विशेष ओळखले जायचे. आपल्या १२ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी १५ एकदिवसीय सामने खेळले. या काळात इतर फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या तेजतर्रार गोलंदाजांचा अंशुमन गायकवाड मोठ्या हिमतीनं सामना करायचे. त्यांच्या अविस्मरणीय खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमच्या कोरल्या गेल्या. विशेषत: १९८३ साली पाकिस्तानविरुद्ध जलंधरमध्ये त्यांनी फटकावलेलं कारकि‍र्दीतलं पहिलं-वहिलं व एकमेव द्विशतक ठरलं.

 

 

 

 

follow us