माजी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन, बीसीसीआयपासून इरफान पठाणपर्यंत सर्वांनी वाहिली श्रद्धांजली

माजी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन, बीसीसीआयपासून इरफान पठाणपर्यंत सर्वांनी वाहिली श्रद्धांजली

Dattajirao Gaikwad : भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांच्याशी संबंधित एक दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या 95 व्या वर्षी दत्ताजीराव गायकवाड यांनी जगाचा निरोप घेतला. गायकवाड हे भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad) यांचे वडील होते. दत्ताजीराव गायकवाड हे गेल्या 12 दिवसांपासून बडोदा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दत्ताजीराव गायकवाड यांच्या आकस्मिक निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. शोक व्यक्त करताना, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले, भारताचे माजी कर्णधार आणि भारताचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांच्या निधनावर बीसीसीआय तीव्र दु:ख व्यक्त करते.

1959 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात दत्ताजीराव गायकवाड 11 कसोटी सामने खेळले आणि संघाचे नेतृत्व केले.त्याच्या नेतृत्वाखाली, बडोद्याने 1957-58 हंगामात रणजी करंडक जिंकला होता. गायकवाड यांच्या कुटुंबीयाप्रती मित्रमंडळी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुकेश अंबानींनी रचला इतिहास! ‘रिलायन्स’ बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी

दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1961 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध होता. रणजी ट्रॉफीमध्ये गायकवाड यांनी 1947 ते 1961 या काळात बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. त्याने 47.56 च्या सरासरीने 3139 धावा केल्या ज्यात 14 शतकांचा समावेश आहे.

8 माजी नौसैनिकांच्या सुटकेशी शाहरुख खानचा संबंध? किंग खाननं स्पष्टच सांगितलं

माजी अष्टपैलू इरफान पठाणने लिहिले की, मोतीबाग क्रिकेट मैदानावरील वटवृक्षाच्या सावलीत आपल्या निळ्या मारुती कारमध्ये भारतीय कर्णधार डी.के. गायकवाड सरांनी बडोदा क्रिकेटसाठी तरुण प्रतिभावान खेळाडू शोदण्यासाठी अथक परिश्रम केले. आमच्या संघाचे भविष्य घडवले. त्याची उणीव प्रकर्षाने जाणवेल. क्रिकेट जगताचे मोठे नुकसान आहे.

शनाया कपूर ते ऑर्री अनेक सिने तारकांनी लावली ‘लादुरी’च्या ओपनिंग इव्हेंटला हजेरी, पाहा फोटो

follow us
  • fb
  • instagram
  • youtube