8 माजी नौसैनिकांच्या सुटकेशी शाहरुख खानचा संबंध? किंग खाननं स्पष्टच सांगितलं

8 माजी नौसैनिकांच्या सुटकेशी शाहरुख खानचा संबंध? किंग खाननं स्पष्टच सांगितलं

Shah Rukh Khan : भारत सरकारने(Government of India) कतारमध्ये (Qatar)तुरुंगात असलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. यापैकी सात अधिकारी भारतात परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात (Al Dahra Global Affairs)गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतार न्यायालयाने या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. या सर्व नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. या अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर (S Jaishankar)आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval)यांचे कौतुक केले जात आहे. त्यातच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy)यांनी या सुटकेमागे अभिनेता शाहरुख खानचा हात असल्याचा दावा केला आहे.

एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार; मोदींचं नाव घेत नितीश कुमारांनी विश्वास व्यक्त केला

अधिकारी परतल्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, या रिलीजमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा हात होता. त्यावर आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानच्या टीमने नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेशी अभिनेता शाहरुख खानचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. संपूर्ण देशाप्रमाणे ते स्वत: देखील अधिकाऱ्यांच्या मायदेशी परतल्याने खूप आनंदी असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख खानच्या टीमने सोशल मीडियावर आपली बाजू स्पष्ट केली आहे. कतारमधून नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात शाहरुख खानचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा यात कोणताही सहभाग नाही, हे आम्ही स्पष्ट करु इच्छितो. ही सुटका केवळ भारत सरकारमुळेच झाली आहे. शाहरुख खान यांचा या अधिकाऱ्यांच्या सुटकेशी काहीही संबंध नाही.

त्याचवेळी, आम्हाला हे देखील सांगायचं आहे की, केवळ आपल्या देशातील नेत्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकारण चांगले माहित आहे. मिस्टर खान, इतर भारतीयांप्रमाणेच, नौदलातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षित परतण्यामुळे आनंदी आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत.

ही पोस्ट शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरुन शेअर केली आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, शाहरुख खानच्या कार्यालयाकडून अधिकृत निवेदन. पूजा ददलानी अनेक वर्षांपासून शाहरुख खानची मॅनेजर आहे. शाहरुखच्या प्रोजेक्ट्सपासून ते इव्हेंट्स आणि अगदी सुट्टीला जाण्यापर्यंत सर्व गोष्टींची ती काळजी घेते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज