श्रीलंकेला व्हाईट वॉश! सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय; श्रीलंकेचा 3-0 ने उडवला धुव्वा
IND vs SL : विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकत श्रीलंकेला (Sri Lanka) व्हाईट वॉश दिला. काल झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हरचा निर्णय घ्यावा लागला होता. या सुपर ओव्हरमध्ये भारतान श्रीलंकेच पराभव केला. या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला तीन धावांचं आव्हान दिलं होतं. यानंतर फलंदाजी आलेल्या सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
IND vs SL : लंकेचा अँजेलो मॅथ्यूज ‘हिटमॅन’ साठी ठरणार डोकेदुखी; काय आहे पूर्व रेकॉर्ड
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हरचा निर्णय घ्यावा लागला. या ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला फक्त दोन धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदरने सुपर ओव्हरमध्ये भेदक गोलंदाजी केली. या सुपर ओव्हरमध्ये पथुम निसांका आणि कुसल परेरा या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना त्याने बाद केलं. त्याच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागतीच पत्करली. त्यामुळे टीम इंडियाला फक्त तीन धावांचं आव्हान मिळालं. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आव्हान पार केलं.
याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना श्रीलंकन गोलंदाजांनी जखडून ठेवलं होतं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असल्याने भारतीय फलंदाजांना मोठे शॉट्स मारता आले नाहीत. त्यामुळे वीस ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून कशाबशा 137 धावा करता आल्या. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर यांच्या व्यतिरिक्त एकालाही दोन अंकी स्कोर करता आला नाही.
Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक
श्रीलंकेच्या महीश तीक्षणाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वानिंदु हसरंगाने 2 विकेट्स घेतल्या तर मेंडीस, चामिंडू विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. इतकेच काय तक सामन्याच्या अठराव्या ओव्हरपर्यंत श्रीलंकेची या सामन्यावर पकड होती.
पाथुम निसांका 26 आणि कुसल मेंडीसच्या 43 धावांच्या बळावर श्रीलंका सामना जिंकण्याच्या स्थितीत होती. परंतु, अखेरच्या दोन ओव्हर्समध्ये सारा खेळच पालटला. या दोन ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज होती. सूर्याने 19 वी ओव्हर रिंकू सिंहला दिली. आता खरी कसोटी रिंकूची होती. रिंकूनेही दमदार गोलंदाजी करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. रिंकून या ओव्हरमध्ये तीन धावा देत दोन विकेट मिळवल्या.
शेवटच्या ओव्हरमध्ये सहा धावा हव्या होत्या. ही ओव्हर स्वतः सूर्याने घेतील. त्यानेही या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला होता. या चेंडूवर तीन धावांची गरज श्रीलंकेला होती. मात्र त्यांना दोनच धावा करता आल्या. त्यामुळे सामना बरोरीत सुटला आणि सुपर ओव्हर घ्यावी लागली.