Ravindra Chavan : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष (BJP) संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे रविंद्र चव्हाण आमदार असून ते राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. त्यांनी 2002 साली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
Former Minister Ravindra Chavan has been appointed as the in-charge of the Bharatiya Janata Party Sanghtan Parv Maharashtra pic.twitter.com/2UvdapDdEa
— IANS (@ians_india) December 28, 2024
नुकतंच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डोंबिवली मतदारसंघातून चौथ्यांदा बाजी मारली आहे. यंदा देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाला नाही. तर आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 131 जागांवर बाजी मारली होती तर शिवसेना शिंदे गटाने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकले होते त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त विधानसभा निवडणुकीमध्ये 46 जागांवर विजय मिळाला आहे.
महिला आयोगाकडे तक्रार, फक्त टीआरपीसाठी माझं नाव, प्राजक्ता माळीचं सुरेश धसांना प्रत्यूत्तर