Download App

महायुतीला धक्का! हिंगोलीतील माजी खासदारांचा स्वराज्य पक्षात प्रवेश; निवडणूक लढणार?

माजी खासदार शिवाजी माने यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.

Hingoli News : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सरळ (Hingoli News) लढत होत असल्याचे दिसत असले तरी चित्र तसे नाही. तिसरी आघाडीही मैदानात आहे. आता या आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. आघाड्यांतील पक्ष तिकीट वाटपात गुंतलेले असतानाच महायुतीला धक्का देणारी बातमी हिंगोलीतून आली आहे. माजी खासदार शिवाजी माने यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे. माने यांच्या पक्षप्रवेशाने परिवर्तन महाशक्ती आघाडी विशेषतः स्वराज्य पक्षाचं बळ वाढलं आहे. आता आगामी निवडणुकीत त्यांना कोणती मोठी जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिंगोलीत ऑल इज नॉट वेल! उमेदवार बदला, अजून वेळ आहे.. हेमंत पाटलांना भाजपाचा विरोध

हिंगोली आणि कळमनुरी मतदारसंघाचे जे मुलभूत प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी सोडवले नाहीत म्हणून शिवसेना पक्ष सोडून महाराष्ट्र स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले आहे. हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी माने इच्छुक आहेत. छत्रपती संभाजीराजे जो निर्णय घेतील, त्या मतदारसंघामधून लढण्यास तयार असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले आहे.

भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये हिंगोलीतून आमदार तानाजीराव मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे भाजपातील तिकीटाची शर्यत संपली. 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत या दोन्ही भाजपने विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपने पुन्हा मुटकुळे यांनाच संधी दिली. त्यामुळे आता महायुतीत तिकीट मिळणार नाही अशी खात्री होती.

Video: ही तर फक्त 25 कोटींची पहिली खेप; अजून चार गाड्या कुठंयंत?, रोहित पवारांचा महायुतीवर वार

रामदास पाटील सुमठाणकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने आणि कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे हे देखील भाजपकडून उमेदवारी मागत होते. मध्यंतरी मुटकुळे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्यूलन्सने उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. यानंतर मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीबाबत वेगळाच प्रचार सुरू झाला होता. परंतु, रविवारी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत त्यांचं नाव होतं. त्यांना उमेदवारी मिळाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता मुटकूळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

follow us