Hingoli Lok Sabha : महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर होताच नाराजीनाट्याचा नवा अंक (Hingoli Lok Sabha) सुरू झाला आहे. या राजकीय नाट्याला हिंगोली मतदारसंघही अपवाद राहिलेला नाही. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. हेमंत पाटील यांचा (Hemant Patil) फोन बऱ्याच वेळा स्वीच ऑफ असतो. हेमंत पाटील यांना जी उमेदवारी मिळाली आहे ती बदलावी. अजूनही वेळ गेलेली नाही, असा इशारा माजी खासदार आणि भाजप नेते शिवाजी माने यांनी दिला आहे.
Hingoli Loksabha : हेमंत पाटलांची उमेदवारी म्हणजे शिंदेंनी लावलेली बाजी..
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांत नाराजी वाढली आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊ नका असे आम्ही वारंवार सांगितले होते. तरी देखील त्यांची उमेदवारी आमच्यावर लादली गेली. पाटील यांना मतदारांशी काहीच देणेघेणे नाही. त्यांचा विश्वास पक्षप्रमुखांवर असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली, असे माने म्हणाले.
हेमंत पाटील यांना कितीही फोन केले तरी ते फोन कधीच घेत नाहीत. त्यांचा फोन बऱ्याचदा स्वीच ऑफ असतो. याचा अनुभव आम्ही सुद्धा घेतला आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. या गोष्टी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्या आहेत. त्यामुळे हा उमेदवार बदला किंवा ही जागा भाजपला द्या असे माने म्हणाले.
Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स
लोकांच्या मनातला उमेदवार दिला गेला पाहिजे. हेमंत पाटलांच्या उमेदवारीबाबत मी नक्कीच नाराज आहे. लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्याबाबत मी बोलतोय. तसं पाहिलं तर हेमंत पाटील माझे मित्र आहेत. जिल्हाप्रमुख पदापासून आतापर्यंत आम्ही त्यांना मदतच केली आहे. मला उमेदवारी मिळत नाही म्हणून मी त्यांच्यावर टीका करतोय अशातला भाग नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. शिवसेनेने फक्त उमेदवार बदलून द्यावा. या मतदारसंघात असा उमेदवारा द्यावा की जेणेकरुन तुम्हाला लोकांमध्ये जाता येईल, असे माने यांनी सांगितले.