Mahesh Sawant : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्षांकडून आपले उमदेवार जाहीर केले जात असतानाच मुंबईतील माहिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीयं. याच मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. माहिममधून तिरंगी लढत झाली तरीही ठाकरे गटाचाच विजय होणार असल्याचं ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ठणकावून सांगितलंय.
राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी
महेश सावंत म्हणाले, माहिम मतदारसंघात जनतेला रोज भेटणारा, रात्री अपरात्री भेटणारा काम करणारा आमदार भेटला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणाचंही आम्हाला आव्हान नाही. समोर उमदेवार कोणीही असुद्या ठाकरे गटाचाच विजय होणार असल्याची मला खात्री आहे. तिरंगी लढत झाली तरीही ठाकरे गटाचाच उमेदवार विजयी होणार असल्याचं खुद्द महेश सावंत यांनी स्पष्ट केलंय.
वायनाडमध्ये आज घमासान! प्रियंका गांधी अर्ज भरणार; काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
तसेच आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या जल्लोषात आम्ही प्रतिक्रिया देत आहोत, त्याच जल्लोषात येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी आम्ही प्रतिक्रिया देणार आहोत. या मतदारसंघातून अनेक इच्छूक उमेदवार होते पण उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवून सांगितलं की, सर्वांनी एकदिलाने काम करुन माहिम-दादरवर पुन्हा भगवा फडकला पाहिजे, त्यामुळे आता सर्वच पदाधिकारी एकदिलाने काम करणार असल्याचं महेश सावंत म्हणाले आहेत.
‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरेंना मिळणार ‘इतक्या’ जागा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदा सरवणकरांना उमेदवारी देण्यात आलीयं. आता ठाकरे गटाकडूनही महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत. ते आत्तापर्यंत एकदाही पराभूत झाले नसल्याने आता महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यासमोर सदा सरवणकरांचं मोठं आव्हान असणार आहे.