Download App

Team India: विधिमंडळात आज ‘या’ चार खेळाडूंचा सत्कार; बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम

टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.

Image Credit: Letsupp

Cricket PlayersFelicitated In Assembly : टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा (Cricket ) आज विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. (Team India) यामध्य कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार सरकार करणार आहे. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येईल.

वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष अन् बुमराहने केला सर्वात मोठा खुलासा

शुक्रवारी टीम इंडियाची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. आपल्या विजयी टीमला पाहण्यासाठी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर चाहत्यांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर ग्रँड सेलिब्रेशन झालं. यावेळी बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.

वादळामुळे विलंब

टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या चार दिवसांपासून भारतीय चाहते आपल्या आवडत्या टीमची वाट पाहत होते. मात्र, बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया काही दिवस तिथे अडकली होती. अखेर गुरुवारी सकाळी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर आगमन झालं आणि चाहत्यांच्या जल्लोषाला सुरुवात झाली.

follow us

वेब स्टोरीज