Fraud by promising government jobs : सरकारी नोकरीचे आमिष (Government Job) दाखवून फसवणूक (Government Job) करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देतो असं सांगत, दोघा आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून त्यानंतर या फसवणूक प्रकरणात आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
विशाल कांबळे आणि साहिल गायकवाड अशी या फसवणूकीच्या प्रकरणात (Government Job Scam) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मिळून तब्बल अठरा जणांंना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
भाजपला झुगारत निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात! नेमकं प्रकरण काय?
सरकारी नोकरीचे आमिष
विशाल कांबळे आणि साहिल गायकवाड या दोघांनी खोटा बनाव (Government Job Scam) करत अनेकांना वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगितले. त्यांनी विशेष करून मंत्रालय, रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देण्याचं खोटं आमिष दिलं. त्यासाठी या दोघांनी पोलीस असल्याचं तसंच राजकीय नेत्याचा सुरक्षारक्षक असल्याचं समोरच्या व्यक्तींना भासवून दिलं आणि फसवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनी तब्बल अठरा जणांची फसवणूक केली आहे.
PHOTO : भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी नतमस्तक! नेते मंडळी, पोलीस अधिकारी अन् कलाकारांनी घेतलं दर्शन
बनावट कागदपत्रांचा वापर
सरकारी नोकरीचे आमिष दाखवण्यासाठी आणि खोटा बनाव करण्यासाठी या दोन्ही आरोपींकडून बनावट कागदपत्रांचा (Government Job Scam) वापर करण्यात आला आहे. मंत्रालयासह रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी मिळवून देण्याचं खोटं आश्वासन देत ही फसवणूक करण्यात आली. त्यासाठी आरोपींनी बनावट ओळखपत्रं आणि आयकर विभागाची बनावट कागदपत्रं वापरली. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून कारवाई दरम्यान ही बनावट कागदपत्रे आता जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष सहाकडून अधिक तपास सुरू आहे.
या फसवणूकीच्या (Government Job Scam) प्रकारानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पोलिसांनी म्हटलंय की, ‘अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये’. असा सावधगिरीचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.