Download App

Gautami Patil : बेटा मला काही नकोय, एकदा येऊन भेट… गौतमीच्या वडिलांची भावनिक साद

Gautami Patil News : आपल्या ठसकेदार ठुमक्यांवर महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या खासजी आयुष्याशी संबंधित बातमी समोर आलीय. प्रसारमाध्यमांनी गौतमीच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी गौतमीच्या वडिलांनी तिला भावनिक साद घालत भेटण्याची विनवणी केली आहे.

“आज जे अनुभवलं ते विलक्षण” : राज यांची स्तुतीसुमने; फडणवीस-ठाकरे सूर पुन्हा जुळले?

गौतमीचे वडिल जळगावच्या चोपडा गावात शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. रविंद्र नेरपगारे असं त्यांच नाव असून कौटुंबिक वादामुळे ते गौतमीच्या आईपासून विभक्त झाले होते. त्यानंतर आज तब्बल 18 वर्षांनतर त्यांना आपल्या मुलीला भेटण्याचं माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे.

उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल

गौतमीचे वडिला म्हणाले, मला गौतमीचा फार अभिमान वाटतो. मला माझ्या लेकीची फार आठवण येते. मला तिच्याकडून काहीही नको. तिने फक्त एकदा येऊन मला भेटावं. माझ्याशी दोन शब्द बोलावेत. गौतमी आणि तिची आई आम्ही पुन्हा एकत्र राहु. गौतमीचं आडनाव पाटीलचं आहे. त्यामुळे ती पाटीलच आडनाव लावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरेंनी दिल्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या वडिलांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता गौतमी पाटीलच्या खाजगी आयुष्याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर बोलताना गौतमीने हा माझा कौटुंबिक प्रश्न असल्याचं म्हणत मी काही बोलू शकत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. आता वडिलांच्या विनवणीनंतर गौतमी त्यांना भेटणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे स्थळ ठरले, ‘या’ ठिकाणी होणार सभा

काही दिवसांपासून गौतमी पाटील सारखी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आधी तिच्या नृत्यावर बोट ठेवून अनेकांनी टीका केली. त्यावर गौतमीने माफीही मागितली. त्यानंतर कार्यक्रमात गोंधळामुळे ती चर्चेच होती. आता आडनावाच्या मुद्द्यावरुन चर्चेत आहे.

गौतमी पाटीला एका संघटनेने पाटील नाव लावू नये, असा इशारा दिला होता. त्यावर गौतमीनेही सडेतोड उत्तर देत पाटील आहे तर पाटीलच नाव लावणार असल्याचं ठणकावलं होतं. त्यानंतर आता तिच्या लावणीच्या नृत्यावर बोट ठेवत छोट्या पुढाऱ्याने गौतमी पाटीलवर रोख धरला. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, या शब्दांत छोट्या पुढाऱ्याने इशारा दिला होता.

छोट्या पुढाऱ्याच्या या वक्तव्यानंतर गौतमीनेही आपली भूमिका स्पष्ट करत प्रत्यक्ष आपण भेटून लावणी विषयावर चर्चा करु, असं सांगितलंय. त्यामुळे आता येत्या 9 जून रोजी गौतमी पाटील अन् घनश्याम दराडे यांची भेट होणार आहे.

Tags

follow us