Download App

Gautami Patil : …नाहीतर ‘मुसंडी’ मारणार, गौतमी पाटीलवर छोट्या पुढाऱ्याचाही निशाणा…

Ghanshyam Darade On Gautami Patil : राज्यात सध्या फक्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्याच (Gautami Patil) कार्यक्रमाची चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं धिंगाणा होणार हे एक गणितचं सुरु आहे. एवढंच नाहीतर नृत्यावरुन गौतमी पाटीलवर अनेकांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या.

Maharashtra Politics : बच्चू कडूंचा संयम सुटला; मंत्रिमंडळ विस्तारावरुन थेट फडणवीसांना सुनावलं

सोलापुरात तर गौतमीविरोधात फसवणूक केल्याची तक्रारही दाखल करण्यात आलीय. अशातच छोटा पुढारी म्हणून ओळख असलेला घनश्याम दराडे (Ghanshyam Darade) यानेही गौतमीला इशारा दिला आहे.

BJP State Executive Meeting : निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांना लॉटरी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करु नये, नाहीतर मी मुसंडी मारणार असल्याचा इशारा दराडे याने दिला आहे. दरम्यान, मुसंडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छोटा पुढारी राज्यभर दौऱ्यावर आहेत. या चित्रपटात छोटा पुढाऱ्याने भूमिका साकारलीय. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Karnataka CM News : सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर, शिवकुमार एकमेव उपमुख्यमंत्री होणार

पुढे बोलताना दराडे म्हणाला, नृत्यांगणा गौतमी पाटील आणि आपला कोणताही वाद नाही. परंतु गौतमी पाटील लावणी बदनाम करीत आहे. गौतमीनेही आमचा मुसंडी चित्रपट पाहावा, असं आवाहनही दराडे याने केलं आहे. घनश्याम दराडे याने गौतमीला इशारा दिल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, गौतमी पाटील आणि वाद, गोंधळ हे समीकरणच बनलंय. अनेक अडचणी येत असल्या तरीही गौतमीच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याचं दिसतंय. एका चाहत्याने गौतमीच्या नावाचा टॅटू काढल्याचंही समोर आलं होतं. अनेक टीका-टिपण्यांना गौतमीला सामोरं जावं लागतं आहे. आता छोटा पुढाऱ्याने तिच्यावर टीका केल्याने यावर गौतमी काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us