Ahilyanagar: सिस्पे घोटाळ्यातील ‘तो’ फरार अखेर पोलिसांच्या जाळ्यात…
SISPE Financial Scam Ahilyanagar: कोट्यवधी रुपयांच्या ‘सिस्पे’ (SISPE) वित्तीय घोटाळा प्रकरणात पोलिसांना यश मिळाले.
SISPE Financial Scam Ahilyanagar: अहिल्यानगर : जिल्ह्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘सिस्पे’ (SISPE) वित्तीय घोटाळा प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात गेल्या काही काळापासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला आरोपी दशरथ विठ्ठल रोडे याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे.
एकनाथ शिंदेंविरोधात नेमकं काय शिजतंय?, भाजपकडं बोट करून कदमांचं खळबळजनक वक्तव्य
काय आहे प्रकरण?
आकर्षक परताव्याचे (Returns) प्रलोभन दाखवून सिस्पे कंपनी आणि तिच्याशी संबंधित चालकांनी हजारो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मुख्य सूत्रधार व महत्त्वाचे आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.
LCB ची धडक कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या फरार आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे घोटाळ्यातील पैशांचा माग काढणे आणि इतर आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी सोपे होणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासह पारनेर, श्रीगोंदा व परिसरातील अनेक नागरिकांचे कोट्यवधी रुपये या घोटाळ्यात अडकले आहेत. या मुख्य आणि महत्त्वाच्या आरोपीच्या अटकेमुळे आता तरी आपले पैसे परत मिळतील, अशी आशा हवालदील झालेल्या गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.