Download App

संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीवर मंत्री गिरीष महाजन यांनी भाष्य केलंय. संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, त्यामुळे ते काहीही बोलत असल्याचा खोचक टोला मंत्री गिरीष महाजन यांनी लगावला आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, संभाजीनगरची दंगल सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

IPL 2023 : बॉलिंग करणाऱ्या संघाची होणार दमछाक, 90 मिनीटात टाकावे लागणार 120 बॉल

मंत्री महाजन म्हणाले, कोण काय म्हणतंय? कोणावर आरोप करतंय? याबाबत आत्ता जी काही अस्पष्टता आहे त्याची स्पष्टता घटनेचे सर्व फुटेज पाहिल्यानंतरच होणार आहे. घटनेचे सर्व फुटेज शासनाकडे आहेत. या फुटेजची सध्या चौकशी सुरु असून चौकशीनंतर यामागे कोणं हे समोर येणार असल्याचंही मंत्री गिरीष महाजनांनी स्पष्ट केलंय.

आमची सभा होऊ नये म्हणून दंगलींचे कारस्थान, सरकारने दिला नपुंसकतेचा पुरावा; राऊतांचा घणाघात

एकीकडे संभाजीनगरची परिस्थिती गंभीर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांनाही मंत्री महाजनांनी सडेतोड उत्तर दिलंय. संजय राऊत यांच्या जीभेला हाड नाही म्हणून ते काहीही बोलू शकतात, ते निवडणूक आयोग आणि न्यायाधीशांबद्दलही बोलू शकतात, सध्या ठाकरे गटाला काय झालंय ते समजत नाही. कालच्या दंगलीमुळे संजय राऊत नाराज झाल्याचं दिसून येत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप

राज्यात सध्या काही लोकांकडून वोटबॅंक सेफ ठेवण्यासाठी असे प्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ठाकरे गटही आमच्यावर आरोप करीत आहे. काही लोकं तर नामांतराच्या मुद्द्यावरुनही राजकारण करीत आहेत. कोणतरी हे जाणूनबुजून करीत आहेत. चौकशीअंती हे सर्व समोर येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

टोकाचं पाऊल, भावी डॉक्टर विद्यार्थीनीची ससूनच्या इमारतीवरून आत्महत्या

एकीकडे दंगलीची पार्श्वभूमी आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सभेचं आयोजन केलंय, ज्या ठिकाणी दंगल झालीय त्याच धर्तीवर सभा घेणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सध्या संभाजीनगर भागातील परिस्थिती गंभीर असून राम नवमी त्यानंतर आता हनुमान जयंती, ईद, नवरात्र उत्सव यांसारखे मोठे सण येत आहेत. आपल्याला सर्वांनाच इथेच राहायचं आहे त्यामुळे सर्वांनीच गुण्यागोविंदाने रहावे, असं आवाहन महाजन यांनी केलंय.

Tags

follow us