टोकाचं पाऊल, भावी डॉक्टर विद्यार्थीनीची ससूनच्या इमारतीवरून आत्महत्या

टोकाचं पाऊल, भावी डॉक्टर विद्यार्थीनीची ससूनच्या इमारतीवरून आत्महत्या

पुणे : ससून रुग्णालयातील इमारतीवरून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली. अभ्यास न झाल्याच्या तणावातून या तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोलल्या जातं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थींनीचे नाव आदिती दलभंजन (Aditi Dalbhanjan) (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असं होतं. आदिती ही तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मुळची गुजरातमधील असलेलं आदितीचं कुटूंब हे सिंहगड रस्ता परिसरात राहत होतं. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला अभ्यासाचं टेन्शन होतं. आदितीच्या वडिलांनी देखील तिला समजून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांनी तसेच कन्सल्टंट डॉक्टरांनी देखील तिला समजून सांगितले होते. डॉक्टरांनी आदितीला काही गोळ्याही दिल्या होत्या. गोळ्या खाल्यानं झोप येईल त्यामुळं अभ्यासावर मोठा परिणाम होईल म्हणून तिने गोळ्याही घेतल्या नव्हत्या.

Vasant More पुन्हा नाराज : कसब्यातील ‘बॅनर’वरून दिला ‘हा’ इशारा

दरम्यान, काल प्रॅक्टिकल असल्याने वडील तिला सोडवण्यासाठी देखील आले होते. मात्र, आदितीच्या मनात वेगळ्याच विचारांचं काहूर निर्माण झालं होतं. आदितीने आपल्या वडिलांना परिक्षेला गेल्यासारखं भासवलं होतं. मात्र, आदिती ही जुन्या कॅज्युअल्टीच्या चौथ्या मजल्यावर गेली. आदितीला अभ्यासाचे टेन्शन आणि परीक्षेमध्ये फेल होण्याची भीती असल्यानं तसेच तिला ही परीक्षा ही द्यायची नव्हती. यामुळे तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्या माहिती पोलिसांनी सांगितली आहे. यात आदितीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या बरगड्या आणि मनगट याला जबर दुखापत झाली होती.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आदितीने ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती तिच्या डोक्याला मार लागला आणि ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी आपत्कालीन विभागात हलविण्यात आले. सर्व स्पेशालिटी डॉक्टरकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube