Download App

ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी; देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार

केंद्रीय मंत्री मनसूख मांडविय यांनी म्हटलं की या बदलामुळं देशातील कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेतून पेन्शनर्स त्यांच्या

  • Written By: Last Updated:

EPFO : ईपीएफओच्या कोट्यवधी सबस्क्रायबर्ससाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत EPFO च्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीय पेन्शन सिस्टीम लागू केली आहे. (EPFO) हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्णय करण्यात आलं होतं. डिसेंबर 2024 पर्यंत 68 लाख पेन्शनर्सना जवळपास 1570 कोटी रुपयांची पेन्शन वाटण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री मनसूख मांडविय यांनी म्हटलं की या बदलामुळं देशातील कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेतून पेन्शनर्स त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात. त्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या निर्णयाचा असा देखील अर्थ आहे की ईपीएफओ पेन्शनर्स देशातील कोणत्याही प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयातून त्यांची पेन्शन काढू शकतात. केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीम देशातील 122 ईपीएफओ कार्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे.

सरकार कापणार पेन्शनधारकांचा खिसा; भारताच्या शेजारी आर्थिक तंगी वाढली

केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय म्हणाले की केंद्रीय पेन्शन योनजेद्वारे ईपीएफओच्या सेवांना अत्याधुनिक बनवण्याच्या आणि आमच्या पेन्शनधारकांसाठी सेवा अधिक पारदर्शक करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. सीपीपीएसचा पहिला पायलट प्रोजेक्ट ऑक्टोबर 2024 मध्ये जम्मू, करनाल, श्रीनगर प्रादेशिक कार्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. यानुसार 11 कोटी रुपयांची पेन्शन 49 हजार पेन्शनर्सना वाटण्यात आली.

दुसरा पायलट प्रोजेक्ट देशातील 24 कार्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला. 24 प्रादेशिक कार्यालयातून 9.3 लाख पेन्शनर्सना 213 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं. दरम्यान, केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले यानुसार फिजिकल वेरिफिकेशन प्रक्रियेची आवश्यकता संपेल. पेन्शन वितरण सोप्या पद्धतीनं होईल. नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसह पेन्शन सर्विस डिस्ट्रीब्युशनमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

follow us