निर्बंध लादलेल्या बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार

Restricted Bank Customers Withdrawals of more than 5 lakhs : गेल्या काही वर्षांत अनेक बॅंकामध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची मोठी अडचण झाली. अनेकांकडे लाखो रूपये अशा अनेक निर्बंध लादलेल्या बॅंकांमध्ये अडकून पडले आहेत. मात्र त्यांना 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नव्हती. मात्र आता या ग्राहकांना सरकारने एक दिलासा दिला आहे.
मेंढ्याच्या कळपातून वाघांच्या कळपात या; शिरसाटांची भास्कर जाधवांना खुली ऑफर
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत विविद विषयांवर उत्तरं दिली आहेत. त्यात त्यांनी निर्बंध लादलेल्या बॅंकांच्या ग्राहकांना विम्यांतर्गत मिळणारी 5 लाखांपर्यंतची रक्कम आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लादलेल्या बॅंकांमध्ये अडकून पडले आहेत. मात्र त्यांना 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नव्हती. मात्र आता या ग्राहकांना 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.
आरबीआयकडून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी…
बँकिंग क्षेत्र नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेवर (New India Co-operative Bank) बंदी घातली आहे. त्यामुळं या बँकेतून कोणताही ग्राहक आपल्या कष्टाचे पैसे काढू शकणार नाही. पुढील सहा महिन्यांसाठी ही बंदी लागू असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा 18 फेब्रुवारीला होणार पदग्रहण सोहळा
13 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने आरबीआयने ही बंदी घातली आहे. आरबीआयने पुढील 6 महिन्यांसाठी बँकेतील सर्व अनावश्यक कामांवर बंदी घातली आहे. बॅंकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने सांगितलं. आरबीआयच्या या कारवाईमुळं आता ना बँकेला कोणता व्यवहार करता येणार, ना ग्राहकांना पैसे जमाण किंवा काढता येणार आहेत. त्यामुळं बॅंकेवर झालेल्या या कारवाईमुळं खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.