Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या. असं अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं आहे. तसेच जर कोणी आमच्या आरक्षणाला (OBC Reservation ) धक्का लवण्याचा प्रयत्न करत असेल तर ओबीसी समाजाने एकवटलेच पाहिजे. असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलत होते.
पंढरपूरला जरांगेंनी एका अपंग मुलाला फाशी दिली, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप
यावेळी बोलताना पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा सामाजावर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले की, सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या. जर कोणी आमच्या आरक्षणाला धक्का लवण्याचा प्रयत्न करत असाल तर ओबीसी समाजाने एकवटलेच पाहिजे. आपले हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाहीत राहतो तर कोणालाही घाबरू नका. भुजबळांच्या पाठीमागे कोणी नाही. अशा बातम्या येतात तर हा जनसमुदाय पाहा सत्तेच्या जोरावर दादगिरी करु असे काहींना वाटले मात्र हाच ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. असा इशारा यावेळी पडळकर यांनी दिला.
Chhagan Bhujbal यांच्या मागे खंबीर उभे राहा अन् हा राग इलेक्शनमध्ये काढा; जानकारांचे ओबीसींना आवाहन
तसेच पुढे पडळकर म्हणाले की, तुम्ही आमची सरपंचकी घ्या तर आम्ही तुमची आमदारकी घेऊ. आता नवीन शब्द आला सगे सोयरे आला आहे. त्यात पैसे देऊन खोटे दाखले तयार केले जात आहेत. यांनी खोटे दाखले घेऊन कुणबी झाले. हे म्हणजे ऊंदराला मांजर साक्ष सगेसोयरे हा गोलमाल शब्द आहे. तुम्ही याचा विरोध केला पाहिजे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रस्ताव; सहमती होईल का?
सरकारने सगे सोयरे यांची अधिसूचना जी काढली ती चुकीची आहे. महाराष्ट्रामधला ओबीसी आता पेटून उठला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर लढल्याशिवाय आपल्यापुढे कोणताही पर्याय नाही. जर कोणी दादगिरीची भाषा करणार असेल तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे. ओबीसीची जाणीव ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याला झाली आहे. असं यावेळी पडळकर म्हणाले.