आम्ही सगळे सैनिक…, आमचा एकच अर्जुन; बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून पडळकरांची तोफ धडाडली

आपल्याला आपला नेता म्हणून मंत्री छगन भुजबळ आपण स्वीकारले पाहिजेत असंही पडळकर यावेळी मेळाव्यात बोलताना म्हणाले.

Padalkar

Padalkar

बीड ही क्रांतीकारांची भूमी आहे. इथून निजामांविरूद्ध आंदोलन झाली. चळवळ उभी राहिली. (OBC) त्यांना इथूनच पळवून लावलं. क्रांतीसिंह नाना पाटील यांनाही याच जिल्ह्याने न्याय दिला आहे. त्यामुळे आज ही काय कुणाची दादागिरी चालू असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. त्याचबरोबर आता माधव अस न ठेवता माधवराव असं आपल्याला करावं लागणार आहे असंही पडळकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आपल्याला आपला नेता म्हणून मंत्री छगन भुजबळ आपण स्वीकारले पाहिजेत असंही पडळकर यावेळी म्हणाले.

आपल्यात फूट पडली तर ते सगळ्यात घातक असेल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो जर कुणी म्हटलं खाली सतरंजीवर बसा तरी लगेच मांडी घालून बसायच असं म्हणत आपल्यातला संघर्ष आपण मिटवला पाहिजे असंही पडळकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आता आपल्याला आपला नेता निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांचे मतभेद बाजुला ठेऊन आपला नेता छगन भुजबळ यांना मानलं पाहिजे. आपण सगळ्यांनी त्यांना आपला नेता मानावं असही ते म्हणाले.

तुम्ही भुजबळ सोडा ओबीसी कार्यकर्त्यालाही हात लावून दाखवा; ओबीसी एल्गार मेळाव्यातून हाकेंचा इशारा

आज आपण सगळे सैनिक आहोत. आपला एकच अर्जुन आहे असं म्हणत छगन भुजबळ हेच आपले नेते असंही पडळकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आमचा हा मोर्चा काही गरीब मराठ्यांच्या विरोधात नाही. प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात हा मोर्चा आणि आमचा लढा आहे असंही पडळकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर जे मराठा समाजाला वेगळ आरक्षण मिळालं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे असंही पडळकर यावेळी म्हणाले.

गरीब मराठ्यांच्या विरोधात ना गोपीनाथ मुंडे होते ना छगन भुजबळ आहे. तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही समर्थन करीत आहोत. ओबीसी सर्व समाज आपला गरीब मराठा समाजाला वेगळं एसईबीसीचं आरक्षण दिलं त्याचं काल समर्थन करत होता आणि आजही करतोय तसेच उद्याही करतो असे यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

त्याचबरोबर पडळकर म्हणाले, आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही.गरीब मराठ्यांचं भांडवल करून प्रस्थापित मराठा समाज छोट्या समाजाचं ‘सरपंच पद’ हिसकावू पाहतोय. त्याला आमचा विरोध आहे. म्हणे सुताराचा मुलगा सरपंच झाल्यावर कसं पुढे बसणार? त्यांना गरीबांची मुलं सरपंच पदावर बसलेले आवडत नाही. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा घाट घातला आहे. आम्ही हा घाट हुसकावून लावू अशी घोषणाच गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.

Exit mobile version