Download App

आर्थिक फसवणूकी विरोधात सरकारचा अॅक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आर्थिक गुप्तचर युनिट’ कार्यान्वित

'Financial Intelligence Unit' ची स्थापना आर्थिक फसवणुकीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Government’s ‘Financial Intelligence Unit’ against financial fraud under guidance of Chief Minister : राज्यात जास्त व्याजाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने ‘Economic Intelligence Unit’ (आर्थिक गुप्तचर युनिट) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पाक लष्करप्रमुखाच्या ‘पोकळ धमक्या’, मोदी पाकची जिरवणार का?

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा करत स्पष्ट केले होते की ‘Economic Intelligence Unit’ (आर्थिक गुप्तचर युनिट) हे विशेष युनिट आर्थिक गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि संगठित आर्थिक गुन्ह्यांची माहिती गोळा करून, त्याचे विश्लेषण करेल आणि संबंधित यंत्रणांपर्यंत ती माहिती पोहोचवेल.

या युनिटची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे:

1. आर्थिक गुन्ह्यांची माहिती संकलन व विश्लेषण करणे

2. बँक घोटाळ्यांवर लक्ष ठेवणे

3. गुप्तचर यंत्रणांच्या सहाय्याने आर्थिक गुन्हेगारी नेटवर्क शोधून काढणे

राज्याला ‘गेमिंग कॅपिटल’ बनवणार; मनोरंजन परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं अश्वासन

या घोषणेनंतर तात्काळ कृती करत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत EIU आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवले जाणार आहे. त्यांना २ सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि ८ पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य मिळणार आहे.

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली पुजाऱ्याची फसवणूक, पूजेच्या बहाण्याने खात्यातून पैसे लंपास नेमकं काय घडलं?

इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट नागरिकांच्या रोजच्या जीवनात दिसून न येणारी, पण फार महत्त्वाची आर्थिक सुरक्षा कवच पुरवण्यात मदत करेल.गुन्हेगारी आर्थिक साखळी उध्वस्त करण्यासही हे युनिट मोलाची मदत करेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनामुळे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसवण्याच्या दिशेने राज्य शासनाने एक निर्णायक आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे.

follow us