पाक लष्करप्रमुखाच्या ‘पोकळ धमक्या’, मोदी पाकची जिरवणार का?

पाक लष्करप्रमुखाच्या ‘पोकळ धमक्या’, मोदी पाकची जिरवणार का?

Pahalgam Terrorist Attack : पहलगाममधील दहशतवादी (Pahalgam Terrorist Attack) हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारत सरकारने (India Govt) पाकिस्तानशी (Pakistan) युध्द करावं, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच भंबेरी उडालीये. मात्र, भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर (Syed Asim Munir) यांनी दिला.

राज्याला ‘गेमिंग कॅपिटल’ बनवणार; मनोरंजन परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं अश्वासन 

प्रक्षोभक विधानामुळे दहशतवाद्यांना बळ…
खरंतर पहलगामधील हल्ल्याचं महत्वाचं कारण आहे, ते जनरल मुनीर याचं चिथावणीखोर भाषण. मुनीर यांनी पहलगाम येथे हल्ला होण्याच्या काही दिवस आधीच काश्मीरबाबत एक वक्तव्य केलं होतं. काश्मीर हा पाकिस्तानसाठी महत्वाचा भाग आहे, जशी मेंदूची नस महत्वाची असते, तसं काश्मीर महत्वाचं आहे, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच चिथावणीखोर वक्तव्यामुळं दहशवाद्यांना बळ मिळालं आणि दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला.

हल्ल्यानंतर भूमिगत, 10 दिवसांनी मुनीर आले समोर…
दरम्यान, या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच सिंधू करार रद्द केला, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. भारतच सरकारची आक्रमक भूमिका पाहून पाकिस्तान इतका घाबरला आहे की, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर हे भूमिगत झाला होते. हल्ल्याच्या तब्बल दहा दिवसानंतर ते आता सैन्यातील एका तुकडीला संबोधित करतानाचे व्हिडिओ समोर आले.

आम्हीही युध्दासाठी तयार – मुनीर
जनरल मुनीर यांनी हॅमर स्ट्राइक सराव पाहण्यासाठी टिल्ला फील्ड फायरिंग रेंजला भेट दिली होती. यावेळी भारताच्या अगदी सीमेजवळ येऊन त्यांनी भाषण केलं. रणगाड्यावर उभं राहून त्यांनी आपलं भाषण ठोकलं. भारताने कोणतंही चुकीचं पाऊल उचललं तर तोडीस तोड उत्तर देऊ, आम्हीही यु्ध्दासाठी तयार आहोत, अशी भाषा मुनीर करत आहेत.

दरम्यान, भारताच्या लष्करी सामर्थ्यांपुढे पाकिस्तान काहीच नाही, याचा कल्पना मुनीर यांना आहे. भारत हल्ला करेल या भीतीने ते पोकळ धमक्या देत असल्याची शक्यता आहे.
रिटायर मेजर गौरव आर्या यांनी मुनीर याचं शीर मला आणून देईल, त्याला मी माझी सर्वसंपत्ती द्यालया तयार आहे, असं विधान केलं. रिटायर्ड मेजर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला थेट आव्हान देत आहे. मात्र, पर्यटकांवर एवढा हल्ला करूनही भारत सरकारने अद्याप पाकिस्तानविरुद्ध थेट अॅक्शन घेतली नाही. सातत्याने भारताला डिवचण्याचं काम पाकिस्तानी नेते, लष्कर प्रमुख करत आहेत. त्यामुळं भारत सरकार या सगळ्या विरोधात काय कारवाई करणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube