Download App

‘छत्रपती शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’; गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य…

ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली - गोविंदगिरी महाराज

  • Written By: Last Updated:

Govindgiri Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुरत लुटली नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवरायांनी खंडणी मागितली होती, असं वक्तव्य केलं. यावर वाद-प्रतिवाद सुरू असतानाच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात वेगळंच वक्तव्य केलं.

Babar Azam : PCB देणार बाबर आझमला पुन्हा धक्का, पाकिस्तान क्रिकेटमध्ये लवकरच होणार मोठा निर्णय! 

ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली, असं वक्तव्य गोविंदगिरी महाराजांनी केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांवरून सध्या राजकारण सुरू आहे. एकीकडे सुरतेच्या लुटीवरून तर दुसरीकडे मालवणमधील महाराजांच्या पुतळा कोसळल्यावरून. तसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. दरम्यान, आज एका वृत्त वाहिनीशी गोविंदगिरी महाराजांनी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराज कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा महाराजांना आर्थिक चणचण भासत असे आणि अशावेळी कुठलाही उपाय दिसत नसे, तेव्हा त्यांनी सक्तीची वसुली केली,असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

Dead Butt Syndrome : … तर उभे राहणेही कठीण होणार, जाणून घ्या काय असतो डेड बट सिंड्रोम? 

ते म्हणाले, आज ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची महाराजांनी सक्तीची वसुली केली, असं मत गोविदगिरी महाराजांनी व्यक्त केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. त्यात रामगिरी महाराजांनी ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीचाी वसुली केली, असं वक्तव्य केलं. त्यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us