प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
Gram Panchayat Election Result : राज्यात 2300 च्या वर ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchayat Election Result) लागले. या निकालावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आम्हीच क्रमांक एकवर असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेसने केला. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट वरचढ दिसत असल्याने दिल्लीश्वर याकडे कसे बघताय हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
राज्यात ग्रामपंचायत निकाल समोर आले. 2300 ग्रामपंचायत पैकी 617 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपने केला आहे. तर अजित पवार गट ने 378 ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनाला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागलं आहे. या विजयानंतर भाजपने प्रदेश कार्यालयात ढोल वाजवत पेढे देखील वाटण्यात आले.
Gram Panchayat Election Result वर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दुसरीकडे काँग्रेसने पत्रक काढत 721 ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला. तर महाविकास आघाडी 1312 जागा जिंकल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत निकालावरून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासून भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याला जनतेने उत्तर दिले असून भाजपच्या पाठीशी उभी राहिली असा दावा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
Sonu Sood: ‘मै भी सोनू सूद’च्या चाहत्यांची भारतभर खास मोहीम; तब्बल 6645 किमीचा प्रवास करणार
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन जनतेच्या दारी गेले. आम्ही जनतेची काम केली. यामुळे जनतेने महायुतीला आशीर्वाद दिले. हे शासन काम करणारे शासन आहे असाही मुख्यमंत्री यांनी सांगितलं. तिकडे काँग्रेस ने सर्वाधिक ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला. महागाई, गैस सिलेंडर, मराठा ओबीसी आरक्षण दुष्काळ नुकसान भरपाई या सर्वच आघाड्यावर हे सरकार फेल ठरलं. या सर्व कारणामुळे जनतेने सरकारला धडा शिकवला. सरकारकडे हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले यांनी दिलं आहे.
खरतर ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही आमदार प्रत्यक्ष भाग घेत नाही. तसेच या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच पक्षातील कार्यकर्ते एक एकमेकांविरोधात षड्डू ठोकून असतात. तर अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत पॅनल तयार करतात. स्थानिक पातळीवर ही परिस्थिती सर्वच राजकीय नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे. असं असताना आम्हीच सर्वाधिक जागा जिंकलो हा दावा विचार करायला लावणारा आहे.