Download App

जरांगे… जीभेला लगाम दे! तुझ्या पोसणाऱ्याला आम्ही… गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunratna Sadavarte Criticize Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांची ( Gunratna Sadavarte) मात्र आगपाखड झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय की, आमचा भटक्या विमुक्तांचा, ओबीसींचे छगन भुजबळ यांना मंत्री केल्यामुळे नागरिकांमध्ये जातियांध जरांगेसारखे अंध सोडले तर सगळ्यांना आनंद झाला आहे.
मला कोणाला अक्कल नाही असं म्हणायचं (Maharashtra Politics) नाही. परंतु जरांगे लक्षात ठेव, तुझ्या जिभेला लगाम दे. माणूस म्हणून पैदा झाल्यानंतर माणूस म्हणून वर्तन करायचं असतं. भुजबळ साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य करत आहे, ते अत्यंत निंदाजनक आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलंय.

छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, २६ हून अधिक नक्षलवादी ठारा, १ कोटींचे बक्षीस असलेला लीडरही संपला

जरांगेंना उद्देशून ते म्हणाले की, जो तुला पोसणारा आणि भुकायला लावणारा आहे, त्याला आम्ही मोजत नाही. लक्षात ठेव. मनोज तुझ्यासारखे आम्ही जातिवादी नाही. भुजबळ साहेब जातिवादी नाही. ज्यांना तु काका म्हणतोस, त्यांच्यासारखे आम्ही नाही. एखाद्या वेळी तरी माणसाने टाळ्यावर राहून बोललं पाहिजे. मनोज जातीवर आरक्षण नसतं. डोक्यातील खिडकी उघड. सामाजिक मागासलेपणावर आरक्षण असतं. नोंदी ज्या आहेत, त्यांची उशी कर आणि डोक्याखाली ठेव, असं देखील सदावर्ते यांनी म्हटलंय.

मराठा आमचे भाऊ आहेत. परंतु अंसैविधानिक आरक्षण मराठा भावांना दिलं जाऊ शकत नाही, असं डंके की चोट पे सांगतो. डोक्यात जात शिरली की, ओबीसीचा माणूस दिसला की, त्याला कमी लेखायचं. भंगार, खेकड्या अशा गोष्टी बोलत आहे, कारण जात डोक्यात गेली आहे. ओबीसींचे सन्माननीय भुजबळ, मुंडे फडणविसांविरोधात जरांगे गरळ ओकत आहे. याला कारण आहे, कारण त्याला हवा भरली जातेय. परंतु भरवलेल्यांचा एक टाईम असतो. पावसाळ्यात जशा छत्र्‍या निघतात, तसा जरांगे पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे. ते जिल्हा परिषदा आणि पुढच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जरांगे वर येणार, अशी टीका देखील सदावर्ते यांनी केलीय.

काय सांगता? गुगल चष्मा देणार प्रश्नांची उत्तरे, थेट मेटाशी स्पर्धा करण्याची तयारी

आतापर्यंत झालेल्या मराठा मुख्यमंत्र्‍यांपेक्षा जास्त सुविधा आणि कायद्यात बसणाऱ्या गोष्टी फडणवीसांच्या सरकारने दिलेल्या आहे. परंतु दबाव तंत्राने घेतलेलं मराठ्यांचं आरक्षण टिकणारं नाही, ते असंविधानिक आहे. हे त्यांना माहित असल्यामुळे ते जरांगेंना बोलायला लावतात, असं गुणरत्न सदावर्त यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंची पाठराखण कोण करतंय? असा सवाल करत सदावर्तेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

follow us