Hasan Mushrif criticizes Satej Patil : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे (Hasan Mushrif) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्यांचा निवडणूक निकालानंतर भ्रमनिरास होईल, त्यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा मेळावा पार पडल्यानंतर सतेज पाटील यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी सरस राहिल असं म्हटलं होतं. यानंतर आता मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली आहे.
माझ्या टप्प्यात आलं आहे
57 पैकी 47 जागा पश्चिम महाराष्ट्रमध्ये महायुतीला मिळतील. गेली 35 ते 40 वर्षे मी शरद पवार यांचा मी कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो आहे. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे. त्यामुळे सुप्रियाताई यांनी हे सगळं समजून घेणे गरजेचं आहे. हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे. राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात आता सावज माझ्या टप्प्यात आला आहे असंही ते म्हणाले आहेत.
न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालीये; तरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले
हसन मुश्रीफ जागावाटपावरून म्हणाले की, महायुतीचे तिन्ही नेते अमित शाह यांच्यासोबत बसलेले आहेत. वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत, जागेचा वाद फारसा राहिला नाही. जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. महायुतीमध्ये लढतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं असतं. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या चिन्हांचा एकत्र काम केलं पाहिजे.
हे मला माहिती नाही
एकमेकांच्या जागा पाडून काम पूर्ण होणार नाही, एकमेकांच्या जागा निवडून आणणे हे गरजेचं आहे. लोकसभेला आमची मते जास्त मिळाली नाहीत हे फडणवीस कोणत्या आधारे बोलले हे मला माहिती नाही. पण विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष जोरदारपणे कामगिरी करतील.