मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची भरती होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्यात लवकरच 12 हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे आता आरोग्य भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरतीमध्ये पेपर फुटीच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. या भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीच्या घटनेप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्री सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर आरोग्य विभागाच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
Rajkumar Rao शाडू मूर्तीने नाही तर ‘असा’ साजरा करतो इको-फ्रेंडली गणेशोत्सव !
महाविकास आघाडीच्या काळात या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील रुग्णालयात दुर्देवी घटना घडल्यानंतर आरोग्य भरतीत राज्य सरकारने विशेष लक्ष घातलं आहे. कर्मचाऱ्यांची वाणवा मिटविण्यासाठी सरकारच्यावतीने आरोग्य विभागात पदांची भरती केली जाणार आहे.
‘सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढणार असल्याची चर्चा सुरु होती.
अखेर आरोग्य विभागाने बंपर भरती करण्याचं घोषित केलं आहे. तब्बल 12 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे.