Rajkumar Rao शाडू मूर्तीने नाही तर ‘असा’ साजरा करतो इको-फ्रेंडली गणेशोत्सव !

Rajkumar Rao शाडू मूर्तीने नाही तर ‘असा’ साजरा करतो इको-फ्रेंडली गणेशोत्सव !

Rajkumar Rao Ganpati : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत असतो. तसेच तो चर्चेत देखील असतो. यावेळी देखील तो पुन्हा चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याच्या इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यामुळे. तो दरवर्षी शाडू मातीची नाही तर चक्क गव्हाच्या पीठापासून गणपतीचा मूर्ती बनवतो.

Gadar 2 धक्कादायक! गदर 2 पाहायला गेला अन् तरूणाने थिएटरमध्येच घेतला अखेरचा श्वास

राजकुमार राव कसा साजरा करतो गणेशोत्सव?

अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय. टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्यांच्या पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते.

पटेलांचा दावा बावनकुळेंचा नियमांसह दाखला; अजितदादा महिनाभरात होणार NCP चे अध्यक्ष?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार रावने (Rajkumar Rao) आपला दृष्टिकोन मांडला “मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे”

बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून राव अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो. राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube