Download App

राज्यात पुन्हा धो धो पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे

  • Written By: Last Updated:

Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा (Maharashtra Rain Alert) जोर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाकडून (IMD Alert) देण्यात आलेल्या माहितीनुसार , राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील दोन- तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गणेशोत्सव काळात पुणेसह मुंबईला पाऊस झोडपून काढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून विदर्भासह, कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पुढील चार दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मोठी बातमी, माता वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन, अनेक लोक जखमी झाल्याची भीती

तर दुसरीकडे मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

follow us