Download App

Hemant Patil : स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा; खासदार हेमंत पाटलांना लंडनहून धमकी

Hemant Patil : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना थेट लंडनमधून धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लंडनहून फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पन्नू असल्याचे सांगत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी दिली. खासदार पाटील यांनी लागलीच या प्रकाराची माहिती लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना देत तक्रार केली. धमकी मिळाल्यानंतर पाटील यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा असेही या धमकी देणाऱ्याने धमकावल्याचे समोर आले आहे.

खासदार हेमंत पाटील यांना हा फोन खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून आल्याचे सांगण्यात येत आहे. धमकी देणारी व्यक्ती इंग्रजीतून बोलत होती. या व्यक्तीने स्वतःचे नाव पन्नू असे सांगितले. प्रजासत्ताक दिनी भारतात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी या व्यक्तीने दिली. या दिवशी होणारा सोहळा आम्ही उधळून टाकू अशी धमकी या व्यक्तीने दिली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही अलर्ट आहेत.  खासदार हेमंत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरासमोरही सुरक्षा देण्यात आली आहे. एसआयटी आणि एसपीयु जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Gurupatwant Singh Threat : माझ्या हत्येचा कट फसला पण आता.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

याबाबत खासदार पाटील यांनीच खुलासा केला. ते म्हणाले, मला 14 डिसेंबर रोजी पहिला फोन आला होता. संबंधित व्यक्ती इंग्रजीत बोलत होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मला पुन्हा 20 तारखेला फोन आला. तो फोन मी घेतला नाही. मी लगेच दिल्लीत वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या कार्यालयाला पत्रही दिलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज