Download App

Thackeray Vs Shinde : शिवसेना म्हणजे ठाकरे असं समीकरण एकनाथ शिंदेनी कसं मोडलं?

  • Written By: Last Updated:

मागच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता.

नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो.
पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही
ते येऊ शकत नाही काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही
म्हणून नावाला जपा नाव मोठं करा

हे बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य राज ठाकरेंनी ट्विटरवर शेअर केलं होत. राज ठाकरेनी बाळासाहेबांचं नाव वापरून उद्धव यांच्यावर टीका केली. पण निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंना मोठा झटका धक्का आहे. कारण गेले पाच दशके शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण आत संपलं आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना असं असलेलं समीकरण शिंदे यांनी कसं बदललं ?

निवडणूक आयोगाचा निर्णय

ठाकरे आणि शिंदे वादामध्ये शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली. आता उद्धव ठाकरे या निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेले, कोर्टाचा निर्णय काय लागेल माहित नाही? पण सध्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण थांबलं आहे.

शिवसेनेची स्थापना

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची पायाभरणी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा ही संघटना आपली ८० टक्के ऊर्जा सामाजिक प्रबोधनासाठी वाहून घेईल, असे सांगण्यात आले होते. राजकीय प्रबोधनात २० टक्के. दोन वर्षांनंतर १९६८ मध्ये शिवसेनेने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली.

१९७१ मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढली. पण यश मिळाले नाही. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला. शिवसेनेने १९७१ ते १९८४ या काळात ताडाचे झाड, ढाल, तलवार आणि रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवली. १९८४ साली शिवसेनेने भाजपच्या कमळावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

त्यानंतर १९८५ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. १९८९ मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे चार खासदार या धनुष्यबाण चिन्हावर विजयी होऊन संसदेत पोहोचले. तेव्हापासून शिवसेना या चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदे यांचं बंड

जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16, तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विरोधात बंड केलं. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच दावा करण्यात आला होता.

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेपुढे मोठे संकट उभे ठाकले. शिवेसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यामुळे दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. दरम्यान राज्यात लागलेल्या पोटनिवडणुकीदसाठी शिवसेना कोणाची या वादावर तोडगा निघेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते.

निडवणुकीनंतर दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार? याची चर्चा सुरु असतानाच निवडणूक आयोगाने शिंदे यांना नाव आणि चिन्ह दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडे पर्याय काय?

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरेंची असलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मिळाली. पण एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला असला तरी याच निर्णयामुळे उद्धव ठाकरेंसमोर लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतात, आज त्यांनी आपला आक्षेप कोर्टात मांडलाही. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असला तरी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत. त्यामुळे ठाकरे सुप्रीम कोर्टात जातील आणि लढतील, पण त्याच वेळी त्यांना कोर्टाचा निर्णय येईपर्यंत नव्या नावाने पक्षाची नोंदणी करून निवडणुकीच्या तयारीला लागणार ? नव्या निणर्याची वाट पाहणार, हे पाहावं लागेल. पण निर्णय काहीही असो ठाकरेंना लढावं तरी लागणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज