Download App

दहाच आमदार…अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू? जयंत पाटलांचा मिश्किल टोला

Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ असून प्रत्येक पक्ष आकड्यांच्या गणितात आपापलं काम करतो. आम्हाला सुद्धा वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, यात काय चुकीचं आहे? असं सुद्धा त्यांनी विचारलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू?

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं अमोल मिटकरी यांनी पांडुरंगाला साकडं घातलं आहे. आता काय आहे की, दहा आमदार घेवून मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर सध्याच्या सरकारमध्ये काहीही (Maharashtra Politics) होवू शकतं. माझ्या इच्छेला कोण विचारतं. दहा आमदार असणारे पक्ष अजित पवारांना मुख्यमंत्री कसं करू शकणार? असं मिश्किलपणे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

भारतात सोनंच सोनं! वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा अहवाल, आकडे ऐकून व्हाल थक्क..

अघोरी विद्येचा वापर


भरत गोगावलेंनी पालकमंत्रिपदासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याच्या चर्चा आहेत. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी अघोरी विद्येचा वापर होत असेल, तर एखाद्या मंत्र्‍याने केल्यास एवढं गांभीर्याने बघण्याची काय गरज आहे, असं जयंत पाटील यांनी मिश्किलपणे म्हटलं आहे. मराठी भाषेला एका बाजूला अभिजात दर्जा द्यायचा अन् दुसऱ्या बाजूला हिंदी सक्तीची करायची असे नियम करायचे. हिंदी पर्यायी आहे. जर दुसरी भाषा घ्यायची असल्यास वीस विद्यार्थी असल्याशिवाय घेता येत नाही. त्यामुळे पुन्हा हिंदीकडेच नाईलजाने वळावे लागेल, हे चुकीचं आहे.

तुमची किडनी खराब होतेय? शरीर देते ‘असे’ संकेत, वेळीच ओळखा अन् सावध व्हा…

हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. पण हिंदी अनिवार्य नको, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढण्याला आम्ही प्राधान्य देणार आहे. एकत्र लढून आम्ही चांगलं यश मिळवू, असं देखील मत जयंत पाटील यावेळी यांनी व्यक्त केलंय.

 

follow us