भाजपच्या महिला नेत्याच्या पतीला बीडमध्ये बेदम मारहाण; काय आहे प्रकरण?

या प्रकरणाने बीड नगरपरिषदेतील एका वॉर्डातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

News Photo   2026 04 12T175657.568

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीला बीडमध्ये बेदम मारहाण; काय आहे प्रकरण?

मस्साजोगचे दिवंत सरपंच संतोष देशमुख (Beed) यांच्या हत्येनंतरही बीडमध्ये गुन्हेगारी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तुझ्या पत्नीला माझ्या पॅनलच्या विरोधात का उभे केले होते, असं म्हणत नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मारहाणीचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातील विविध शहरात काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडल्या. बीड नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. मात्र, त्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल काही नेत्यांच्या मनात अद्याप कायम असल्याचे समोर येत आहे. बीड नगरपरिषदेतील एका वॉर्डातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मला तू खूप आवडते! बीडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

बीड नगरपरिषद निवडणुकीत तुझ्या पत्नीला माझ्या पॅनलच्या विरोधात का उभे केले होते, असे म्हणत बाळू जाधव आणि इतर चार जणांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सागर देशपांडे हे रात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या समोर उभे असताना पाच जणांनी येऊन त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पाच जणांनी केलेल्या जबर मारहाणीत सागर देशपांडे हे जखमी झाले आहेत.

या मारहाणीत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मारहाण करून परत जाताना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ५ आरोपींवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

Exit mobile version