Download App

पुणे : मला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचयं अन् पुढच्या मिनिटाला अजितदादांनी खटका उडवला  

Ajit Pawar On Dhananjay Munde :  राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ॲक्शन

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Dhananjay Munde :  राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ॲक्शन मोडमध्ये दिसत असून दररोज धडाकेबाज निर्णय घेत आहे. राज्यातील नागरिकांसाठी आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं आहे अशी भूमिका त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. विशेष म्हणजे अजितदादांच्या या विधानाचा प्रत्ययदेखील पुढील काही मिनिटातचं अनुभवण्यास मिळाला.

समोरून प्रश्न येताच थेट फोन लावण्याचे दादांचे आदेश

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार होत नसल्याची टीका विरोधक सरकारवर करत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देखील यावर प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यांनी थेट मंत्रालयातील अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावण्याचे आदेश दिले आणि संबंधित सचिवांना पगार का झाला नाही असा प्रश्न विचारला. त्यानंतर आमच्या विभागाकडून पगाराचे पैसे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र काही विभागाच्या काही टेक्निकल प्रॉब्लममुळे शिक्षकांचे पगार उशीरा होत असल्याचे अजितदादांनी पत्रकारांना सांगितले.

बडी मुन्नी कोण ते सुरेश धस यांना विचारा

तर दुसरीकडे यावेळी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, या प्रकरणात सध्या न्यायालयाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात तीन एजन्सी चौकशी करत आहे. जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करेन. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही . पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

तसेच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुरावे द्यावेत. नाहीतर आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. बडी मुन्नी कोण ते सुरेश धस यांना विचारा असल्या फालतू गोष्टींवर मी बोलणार नाही. असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पुण्यात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीबद्दल देखील प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का? निर्माण व्हावा. हे शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. मी यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘धनंजय मुंडे 25 जानेवारीनंतर आपण भेटू अन् …’ आक्रोश मोर्च्यात मनोज जरांगेंचा इशारा

तर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना ॲक्शन मोडवर रहायलाच लागते. त्यांचे कौतुक होत तर चांगलेच आहे. पण इतर मंत्री काम करत नाहीत असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. उगाचच टीका करत आहे. असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी रोहित पवारांना दिला.

follow us