‘धनंजय मुंडे 25 जानेवारीनंतर आपण भेटू अन् …’ आक्रोश मोर्च्यात मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांना लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण (Paithan) येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बोलताना पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या मोर्च्यात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील एकही आरोपी जर सुटला तर सरकारची गाठ आमच्याशी आहे. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच जीवात जीव असे पर्यंत संपूर्ण समाज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे राहणार असेही जरांगे पाटील म्हणाले. तसेच जेव्हापर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या राज्याचा एकही माणूस एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा देखील मंत्री धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आता धनंजय मुंडे यांनी नवीन प्रयोग सुरु केले आहे. नवीन षडयंत्र सुरु केले आहे. राज्यात त्यांच्या लोकांना रास्ता रोको आंदोलन, मोर्चा काढण्यासाठी धनंजय मुंडे सांगत आहे असा आरोप देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला. तसेच धनंजय मुंडे आता जास्त खोलात जात आहे आणि त्यांच्या लक्षात ही बाब येत नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तर धनंजय मुंडे आरोपींच्या मागे उभे आहे असा आरोप देखील त्यांनी केला आणि जर तुमच्या घरात कोणी मेल्यावर मराठ्यांनी देखील असेच मोर्चे काढायचे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्ही आता मंत्री आहे. तुम्ही सुविधांची शपथ घेतली आहे मात्र तरीही देखील तुमच्या लाभार्थी गुंड टोळीला राज्यात आंदोलने करण्यास लावतात आणि आरोपीला साथ देतात ही दिशा धनंजय मुंडेंची चांगली नाही. असेही या मोर्च्यात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.
राज्यातील पेपरफुटीसह विद्यापीठ प्रश्नांबाबत सत्यजित तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट
मी परभणीत कोणा जातीला धमकी दिली नव्हती. आम्हाला जातीवाद येत नाही. या प्रकरणात ओबीसींचा काय संबंध? आम्ही गुंडाना सोडणार नाही. मनोज जरांगे न्यायासाठी लढत आहे आणि लढणार. मी गुन्ह्याला घाबरत नाही. असं देखील पैठणमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच 25 जानेवारीनंतर धनंजय मुंडेंचे सर्व केसेस बाहेर काढणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला.