तर सर्वात पुढे मी उभा राहीन… संगमनेरच्या रेल्वेसाठी सुजय विखे मैदानात

Sangamner railway project संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

Sujay Vikhe

Sujay Vikhe

I will stand at forefront Sujay Vikhe steps up for the Sangamner railway project : अहिल्यानगरमधील संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तर आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत,त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेही लक्षात राहणाऱ्या डान्स नंबर्समधून ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री!

रहिमपूर ता संगमनेर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे म्हणाले पद, मंत्रीपद किंवा राजकीय जबाबदाऱ्या येतात-जातात, मात्र केलेले काम अनेक वर्षे लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे काम हीच आमची ओळख आहे, असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा आणि पुण्याईचा उल्लेख केला. सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळे विखे पाटील परिवाराला समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली असून ती संधी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरणे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

चाकण, तळेगावची कोंडी सोडवा; उद्योजकांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर

संगमनेरच्या रेल्वेच्या प्रश्नावरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तर आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत,त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला.

उपपंतप्रधानपदावरून मोदी-शाह यांच्यात वाद? संजय राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात चर्चांना उधाण

संगमनेरचा विकास झाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट करताना महायुती सरकार संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मोठी बातमी! टेक ऑफ करताना उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पायलटच्या लक्षात आलं अन्यथा…

एखादा प्रश्न नियमात बसत नाही म्हणून तो नाकारण्याची भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने मार्ग काढणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. गरीबांच्या डोळ्यातील पाणी पुसता आले, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले आणि त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन देता आले, तर त्याच कामाला खऱ्या अर्थाने लोकसेवा म्हणता येईल, अशी भूमिका डॉ. विखे पाटील यांनी मांडली.

नीट विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा! आंदोलनांतील गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढली

आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुढील अधिवेशनात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमिनी बळकावण्याच्या तक्रारींबाबत प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून, संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक वनहक्कांशी संबंधित जमिनींच्या नोंदी, स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना यांसारख्या प्रश्नांवर शासनाने घेतलेल्या निर्णयांचा लाभ समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांना होत असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.

एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ! ‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…

शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आश्रमशाळा, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत युवकांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी समाजाच्या आरोग्य, जमीन, शिक्षण आणि इतर मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन देताना आमदार खताळ म्हणाले की, डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

 

Exit mobile version