ना पूजा खेडकरांची, ना त्यांची आईची, लाल दिव्याच्या ऑडीचा मालक तिसराच…

Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर वापरत असलेली कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची आहे.

Pooja Khedkar

Pooja Khedkar

Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचे अनेक कारनामे समोर येत असून नुकतीच त्यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमल बदली करण्यात आली. दरम्यान, पुण्यात कार्यरत असताना पूजा खेडकर यांनी एका ऑडी कारवर (Audi car) सरकारी लाल दिवा लावल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. मात्र, ही कार नेमकी कोणाची आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

“अरे वा, आपण एकत्र यायलाच पाहिजे”; राऊतांनी विचारलं, चंद्रकांतदादांच्या रिप्लायनं टायमिंग साधलं 

पूजा खेडकर वापरत असलेली कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची आहे.

विजय कुंभार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं की, पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीच्या मालकीची आहे. या कंपनीचे मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्यासोबत डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. पूजा खेडकर ह्या देखील डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक राहिलेल्या आहेत.

Hasan Minhaj: अमेरिकन अभिनेत्याने अनिल कपूरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे केलं तोंडभरून कौतुक ! 

दरम्यान, पूजा खेडकर वापरत असलेल्या ऑडी कारवर अनेक दंड (चलान) ठोठावण्यात आले आहेत. या कारवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या 21 तक्रारी आहेत. याशिवाय या कारला 27 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, तो अद्याप वसूल झालेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पूजा खेडकर यांचा पोलिसांवर दबाव
नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला खेडकर यांच्या बाबत एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर त्यांच्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी दबाव आणला होता. स्टील चोरीच्या प्रकरणात या नातेवाईकाला अटक करण्यात आली होती. त्याला सोडण्यासाठी पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपींना फोन करून दबाव टाकला होता, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा खेडकर ह्या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. त्या नगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.

Exit mobile version