“अरे वा, आपण एकत्र यायलाच पाहिजे”; राऊतांनी विचारलं, चंद्रकांतदादांच्या रिप्लायनं टायमिंग साधलं

“अरे वा, आपण एकत्र यायलाच पाहिजे”; राऊतांनी विचारलं, चंद्रकांतदादांच्या रिप्लायनं टायमिंग साधलं

Maharashtra MLC Elections 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान (Maharashtra MLC Elections 2024) होत आहे. मतदान सुरू झाले तशी विधिमंडळाच्या आवारात लोकप्रतिनिधी आणि राजकारणी मंडळींची लगबग सुरू झाली. कॅमेऱ्यांसमोर एकमेकांना अगदी पाण्यात पाहणारे नेते आमदार आणि खासदार. गप्पा टप्पा, मनमोकळे हस्तांदोलन आणि पाठीवर थाप टाकून खळखळून हसताना दिसत होते. अशातच असा एक किस्सा कॅमेऱ्यांनी टिपला ज्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. हा दिलखुलास प्रसंग घडला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यात.

खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात (Chandrakant Patil) विधिमंडळाच्या आवारात भेट झाली. संजय राऊत चंद्रकांत दादांच्या दिशेने गेले आणि त्यांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांनी हसत हसत गप्पाही मारल्या. राऊत गमतीनं म्हणाले “अरे आपण तर पु्न्हा एकत्र यायला हवं.” त्यावर दादांचं उत्तरही मिश्किलच होतं. “तुमचं वाक्य असेल तर मी ही लाईन घेणार.” मग राऊतांचाही खास रिप्लाय आला. “मी नेहमी लाईनच देत असतो”, असं राऊत म्हणाले. यानंतर दोघांत चांगलाच हास्यकल्लोळ उडाला.

MLC Election : काँग्रेसचे चार आमदार फुटणार?, दोघांनी रात्रीच कल्टी मारली 

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊतांना या भेटीबाबत विचारलं. त्यावर राऊत म्हणाले चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतो. अमित शहा आम्हाला भेटतात, हात हातात घेतात. चंद्रकांत पाटील राज्याचे मंत्री आहेत. त्यांचं आणि आमचं काही वैयक्तिक भांडण आहे का असा सवाल राऊत यांनी विचारला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube