Chandrakant Khaire यांचे शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराला थेट आव्हान ; ‘पत्थरबाजी का जवाब…

Chandrakant Khaire यांचे शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराला थेट आव्हान ; ‘पत्थरबाजी का जवाब…

औरंगाबाद : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेच्या दरम्यान औरंगाबादमध्ये (Aurangabad) गोंधळ झाल्याची घटना समोर आली. तर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाला जबाबदार ठरवत, ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ असा आव्हान त्यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, पोलिसांनी काहीच सहकार्य केले नाही. मी पोलिसांना सांगितले की, शांतता ठेवा. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले, त्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे आम्ही सतर्क होतो. पुढे काही झाले असते तर आम्ही काही शांत बसलो असतो का ? असा सवाल यावेळी त्यांनी केला. आदित्य ठाकरे गेल्यावर कधीना कधी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना उत्तर देणार आहे. ‘पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा’ असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हान केलं.

दरम्यान या सर्व घटनेला वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात जो काही गोंधळ झाला आहे, तो शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच घडवून आणला आहे. लांब बसून बोरनारे यांनी हे कारनामे केले आहेत, समोर असते तर त्यांना उत्तर दिल असत. सर्व काही सुरळीत असतान मुद्दाम काही लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी जाणीवपूर्वक काही लोकांना दारू पाजून या कार्यक्रमात घुसवले. त्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे थोडी गडबड झाली. यात पोलिसांनी दुर्लक्ष केले. मी स्वतः पोलीस महासंचालक यांच्याकडे जाऊन त्यांची थेट भेट घेणार आहे. आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असताना अशा घटना घडत आहेत. त्यांच्या सुरक्षेतील ५ पोलीस तर गाडी खाली उतरलेच नसल्याचे पाहायला मिळत होते. तर शिवशक्ती आणि भीमशक्ती अशी युती होऊ नये, म्हणून शिंदे गटाकडून हा कट रचण्यात आल्याचा आरोप देखील चंद्रकांत खैरे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube