हवामान विभागाने दिली गुड न्युज! राज्यात वर्तवला सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

IMD Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उन्हाळ्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहे. या भागात लोकांना वाढत्या

IMD Monsoon Update : हवामान विभागाने दिली गुड न्युज! राज्यात वर्तवला सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

IMD Monsoon Update : हवामान विभागाने दिली गुड न्युज! राज्यात वर्तवला सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

IMD Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उन्हाळ्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहे. या भागात लोकांना वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जून महिन्यापासूनच चांगल्या पावसाची (Mosoon 2024) शक्यता आहे. याच बरोबर राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज (27मे) भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mohapatra) यांनी मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. यावेळी देखील त्यांनी देशात 106 टक्के पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे.

मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, सध्या मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. रेमल चक्रीवादळामुळे (Cyclone Remal) मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरात वेगाने वाटचाल सुरु केली आहे.  यामुळे पुढील पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र जून महिन्यात ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता असून या भागात सरासरी 94 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल आणि महाराष्ट्रासह मध्य भारतात आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यापासूनच राज्यात पावसाचा जोर राहणार असून जून महिन्यात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगला राहणार आणि विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

80 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या ‘या’ शानदार बाइक्सना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

तर एल-निनोची स्थिती कमी होत असल्याने देशात जून ते जुलै पेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडणार असल्याची देखील माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा दिली आहे.

Exit mobile version