Download App

रामगिरी महाराजांना अटक करा, हजारो वाहनांसह इम्तियाज जलील ‘या’ मार्गाने मुंबईच्या दिशेने करणार कूच

Imtiaz Jaleel : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या

  • Written By: Last Updated:

Imtiaz Jaleel : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या (23 सप्टेंबर) तिरंगा झेंडा घेऊन हजारो वाहने मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याची माहिती एमआयएमचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली आहे.

रामगिरी महाराज यांच्या अटकेसाठी संपूर्ण राज्यात आंदोलने आणि निषेध मोर्चे काढण्यात आले होते मात्र सरकारकडून रामगिरी महाराज यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने 23 सप्टेंबर रोजी संभाजीनगरातून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याची माहिती देखील यावेळी इम्तियाज जलील यांनी दिली. तसेच उद्याची रॅली ही राज्यातील सर्वात मोठी रॅली असणार आहे ज्याची नोंद देशाकडून घेतली जाईल असा दावा देखील जलील यांनी केला आहे.

आम्ही उद्या शांततेच्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहे मात्र सरकारकडून यात खोडा घातला घातला जात आहे त्यामुळे आम्ही गंगापूर-वैजापूर मार्गे न जाता समृद्धी महामार्गावरून मुंबईला जाणार आहोत असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्या या रॅलीला गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र आम्ही सरकारच्या कोणत्याही षडयंत्राला बळी पडणार नाही आणि या रॅलीमध्ये काहीही चुकीचे करणार नाही असं देखील जलील म्हणाले.

तसेच सकाळी साडेसात – आठच्या सुमारास आमची सगळी वाहने समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जाणार आहे आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणमधून येणाऱ्या लोकांनी आपापल्या सोयीने समृद्धी महामार्गावर आमच्यासोबत या असा आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केला.

मोठी बातमी! 23 सप्टेंबरला अहमदनगर जिल्हा बंद, ‘हे’ आहे कारण

उद्या आम्ही मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना आणि पोलिसांना संविधानाची प्रत देणार आहोत ज्यामुळे त्यांना आठवण येईल हा देश घटनेवर चालतो. सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून जे पोलिस अधिकारी चुकीचा काम करत आहे त्यांना देखील आम्ही आठवण करून देणार आहोत असं देखील फेसबुक लाईव्हमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले.

… तर थिएटर मालकांनो महागात पडेल, पाकिस्तानी चित्रपटावरून राज ठाकरेंचा इशारा

follow us