छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे. (Election) महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळवलेला भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत मागे पडताना दिसत आहे. इथं शिवसेना शिंदे गट भाजपला टफ फाईट देत आहे. दोन्ही पक्षात कांटे की टक्कर सुरू असून शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात आता संभाजीनगरमधून एक धक्कादायक निकाल पुढे आला आहे.
इथं अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा तगडा उमेदवार पाडला आहे. अवघ्या एका मताने विजय झाल्याने आता शिंदे गटाकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. आता इथं फेरमतमोजणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीएम मतमोजणीत सचिन गरड हे १७ मतांनी आघाडीवर होते. पण पोस्टल बॅलेट मतात त्यांचं लीड कमी झालं.
Zilla Parishad Result : अजितदादांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेला उमेदवार झाला विजयी
संभाजीनगर मध्य पश्चिम गटात वडगाव कोल्हाटीमध्ये एकूण १६ बॅलेट मतं पडली होती. ही सगळी मतं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाली. तरीही ईव्हीएममध्ये १७ मतं अधिक असल्याने सचिन गरड एक मताने विजयी झाले. गरड हे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाला असला तरी अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आली नाही. शिंदे गटाकडून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे इथं मतमोजणी होणार का? झाली तर कोण जिंकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल २०२६
63 / 52
भाजप : 16
शिवसेना : 18
शिवसेना UBT: 6
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस : 2
वंचित : 00
MIM: 2
