Download App

धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीत दारू कमी पडल्याने ‘बर्थ डे बॉय’ला चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं

उल्हासनगरमधून धक्कादाय बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

Image Credit: Letsupp

Thane Ulhasnagar Crime : उल्हासनगर मद्यधुंद ‘बर्थ डे बॉय’ने मित्राकडे आणखी दारू मागितल्याने झालेल्या वादातून तीन मित्रांनी मिळून त्याला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून फेकून दिलं ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. (Crime)  ही धक्कादायक घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. (Ulhasnagar ) पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीअंती हत्येचा उलगडा झाला असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. (Satsang) कार्तिक वायाळ (वय २३, रा. चिंचपाडा परिसर) असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.

सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी

कार्तिक वायाळ याचा २७ जूनला वाढदिवस होता. प्रथम एका ठिकाणी सेलिब्रेशन झाल्यावर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होते. पहाटेपर्यंत पार्टी सुरू राहिली. दरम्यान, दारूची झिंग चढलेल्या कार्तिकने पुन्हा दारूची मागणी केली. त्यावर आपण खूप मौज केली आहे, आता दारू नको, असं कार्तिकला समजावण्यात आले. पण राग आलेल्या कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नीलेश क्षीरसागर, सागर काळे, धीरज यादव या तिघांनी कार्तिकला जबर मारहाण केली आणि चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिलं. त्यामध्ये कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.

Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी

याप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सखोल तपास केला असता, कार्तिकची हत्या करण्यात आल्याचं उघड झालें. दोन दिवसांत हा उलगडा झाला. कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांच्याविरोधात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने या घटनेचा उलगडा केला.

follow us

वेब स्टोरीज