Indapur Crime : इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; ‘भररस्त्यात लोखंडी रॉडने…’

Indapur Crime : इंदापूरच्या तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; ‘भररस्त्यात लोखंडी रॉडने…’

Indapur Tehsildar Attack: इंदापूरचे (Indapur Crime) तहसीलदार श्रीकांत पाटील (Shrikant Patil) यांची शासकीय गाडी फोडत त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घेतला घडली. (Indapur Police) हा हल्ला शहरातील मोठ्या संविधान चौकात करण्यात आला आहे. पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी स्कॉर्पिओ कारमधून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.


तहसीलदार श्रीकांत पाटील हे 11:15 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या दिशेने जात होते. इंदापूर पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या संविधान चौकात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील आणि त्यांचे चालक मल्हारी मखरे हे गाडीमध्ये होते. हल्लेखोरांनी चालकाच्या दिशेने मिरची पूड टाकत संपूर्ण गाडी लोखंडी रॉडने फोडल्याचे सांगितले जात आहे.

बाजीरावचं जम्मू-काश्मीरमध्ये खास मिशन; ‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणची पहिली झलक आली समोर

या धक्कादायक घटनेनंतर श्रीकांत पाटील आणि चालक मल्हारी मखरे यांना इंदापूर उपजिल्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदरील हल्ला हा वाळूमाफियांकडून करण्यात आला असावा, असा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर महसूल प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवत पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. सध्या इंदापूर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज