International Youth Day : कोरोनाच्या काळात शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या घसरणीत भारतातील करोडो युवकांनी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market) केल्याचे चित्र होते. मात्र, आता काळानुरूप युवकांची स्मार्ट पद्धतीने गुंतणूक करण्याकडे मोर्चा वळवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा वर्ग 18 ते 30 वयोगयातील असून, कोल्हापुराती युवकांचा वाटा यात मोठा आहे. आंतरराष्ट्रीय युवादिना निमित्त (International Youth Day) युवक नेमकी कशात गुंतवणूक करत आहेत याचा घेतलेला आढावा…
एलआयसीची खास योजना, मिळणार 19 लाख, गुंतवणूक फक्त 150 रुपये
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये तरुण गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकणाऱ्या Share.Market च्या अहवालानुसार, सुमारे ४८ टक्के म्युच्युअल फंड गुंतवणूकदार १८ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान ६ लाखांहून अधिक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या विश्लेषणातून समोर आले आहे. याचा अर्थ असा की, सध्याची तरुण
पिढी आता दीर्घकालीन गुंतवणुकीकडे पाहत आहे.
कोणत्या राज्यातील युवक आघाडीवर?
समोर आलेल्या डेटानुसार जनरेशन झेडमधील सुमारे ९५ टक्के युवक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक इक्विटीद्वारे सुरू करतात. यावरून अल्पकालीन बचत पर्यायांच्या तुलनेत उच्च जोखीम नफा असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये त्यांची स्पष्ट आवड दिसून येत आहे. याशिवाय, तरुण गुंतवणूकदार शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक वर्तनाला प्राधान्य देत आहेत.
युवकांच्या गुंतवणुकीत महाराष्ट्रातील १६ टक्के, उत्तर प्रदेश ११ टक्के आणि कर्नाटकातील ८ टक्के तरुण गुंतवणूकदारांमध्ये आघाडीवर आहेत. तर, सुमारे ८१ टक्के तरुण गुंतवणूकदार जोधपूर, रायपूर, विशाखापट्टणम, गोरखपूर, म्हैसूर, जमशेदपूर आणि कोल्हापूर सारख्या B30 (टॉप ३० च्या पलीकडे) शहरांमधील आहेत.
गुडन्यूज! राज्यात 16 लाख युवकांना मिळणार नोकऱ्या; दावोसमध्ये 54 करारांवर शिक्कामोर्तब
गुंतवणुक नेमकी कशी?
शेअर.मार्केटच्या अहवालानुसार, ९२ टक्के गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारे असून, ते दरमहा एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत. ज्याचे सरासरी व्यवहार मूल्य सुमारे १,००० रुपये आहे, जी ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गुंतवणूकदारांपेक्षा १८ टक्के कमी आहे. सुमारे २१ टक्के तरुण गुंतवणूकदारांनी किमान एकरकमी गुंतवणुकीता पर्याय निवडला असून, ज्याचे सरासरी व्यवहार मूल्य सुमारे ८,००० रुपये आहे, जे ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गुंतवणूकदारांपेक्षा ३० टक्के कमी आहे.
३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुंतवणूकदारांमध्ये व्हॅल्यू/कॉन्ट्रा आणि फ्लेक्सिकॅप सारख्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडची श्रेणी सर्वात पसंतीपैकी एक आहे, यात ७० टक्के युवांकडे यापैकी किमान एक श्रेणीचा निधी आहे. त्याशिवाय युवावर्ग मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत आहेत.