संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची भूमिका वेगळी का? असा सवाल उपस्थित करत भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. महाविकास आघाडीबाबत ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे. आदित्य ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करुन महाराष्ट्राला माहिती देण्याचं आव्हान दिलं आहे. दरम्यान, सत्तासंघर्षानंतर नितेश राणे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये चांगलचं वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या भूमिकेवरुन राणेंनी निशाणा साधला आहे.
Movies Releasing This Week: ‘आठवणी’ ते ‘७२ हुरें’; जुलैच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!
नितेश राणे म्हणाले, मातोश्रीच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी एक भूमिका मांडली तर दुसरीकडे संजय राऊत वेगळं बोलत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे महाविकास आघाडीसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच दिलं आहे. ते म्हणाले, संजय राऊत म्हणतात ठाकरे गट महाविकास आघाडी महाराष्ट्रात मजबूतीने एकत्र फिरणार आहे, तर दुसरकीकडे आदित्य ठाकरे ‘एकला चलो रे’चा नारा देत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करावी. असं राणेंनी स्पष्ट केलं आहे.
LetsUpp Special :मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये
ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे. काल मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली. ही बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून समान नागरी कायद्याबाबत मसुदा तयार झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं. तर पक्षाच्या संघटनासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.
तसेच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार, खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर आदित्य ठाकरेंनी पुढील काळातील निवडणुका कोणासोबतही आघाडी न लढता ‘ऐकला चलो रे’चा नारा देत स्वबळावर लढणार सूचक विधान केलंय. त्यामुळे आता पुढील काळात ठाकरे गट स्वबळावर लढणार की आघाडीमध्ये? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.