Download App

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची बिश्नोई गँगने कशी केली निवड?, वरातीतल्या गोळीबाराची खतरनाक कहाणी

शिवकुमार गौतमनेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचं तपासात दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे

  • Written By: Last Updated:

Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची नुकतीच मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबरला सदर घटना घडली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून करण्यात आला आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे. त्यामध्ये एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँग कनेक्शन; पोलिसांनी फेसबुक अन् इन्स्टाकडून माहिती मागवली

उत्तर प्रदेशात वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी शिवकुमार गौतमने काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता आणि हेच पाहून शिवकुमार गौतमची निवड करण्यात आली होती. तसंच, शिवकुमार गौतमनेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचं तपासात दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे संवाद साधत असल्याचं चौकशीत समोर आलं. चॅटिंगसाठी स्नॅपचॅट, तर इन्स्टाद्वारे व्हिडीओ कॉल करत असल्याचंही समोर आलं आहे.

बाईकवरून मुंबईत रेकी

कुर्लामधील भाड्याचे घर घेताना शिवकुमार गौतमने त्याचं खरे कागदपत्रं दिले होते. घर मालकाची गुन्हे शाखेच्या कक्ष 9 अंतर्गत चौकशी सुरू आहे. हरिशकुमारने पुण्यात 60 हजार रुपयात बाईक खरेदी केली. याच बाईकने पुण्यातून मुंबईत आला. रेकीसाठी ही बाईक शिवकुमारकडे दिली. पुढे शुटर्सकडून याच बाईकवरून मुंबईत रेकी करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या रूममध्ये राहणाऱ्यांना तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनू या 2 जणांना ताब्यात घेतलं आहे.

बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली

लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे.

follow us