मोठी बातमी : घरात घुसून मारू; गाडी बॉम्बनं उडवून देऊ; ‘भाईजान’ सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Actor Salman Khan receives another death threat : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याुमळे मोठी खळबळ उडाली असून, यावेळी सलमानला देण्यात आलेल्या धमकीत घरात घुसून आणि गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवलेल्या संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर, वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. ही धकमी नेकमी कुणी दिली यामागे कुणाचा हात आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोईकडून आली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Mumbai | Actor Salman Khan receives another death threat. The threat was sent via WhatsApp to the Worli Transport Department’s official number. The message warned to kill Salman Khan at his residence and blow up his vehicle using a bomb. A case has been registered at the Worli…
— ANI (@ANI) April 14, 2025
गॅलक्सी अपार्टमेंटला लावल्या बुलेटप्रुफ काचा
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. या अभिनेत्याला यापूर्वीही अशाच प्रकारच्या धमक्या अनेकदा मिळाल्या आहेत. मध्यंतरी सलमान खानला बिश्नोई गँगकडून सातत्याने जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सलमान खानने (Salman Khan) सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाल्कनीमध्ये बदल केले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रुफ काच लावल्या आहेत. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर 2024 च्या एप्रिल महिन्यामध्ये गोळीबार झाला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली. गॅलक्सी अपार्टमेंटला तगडा बंदोबस्त करण्यात येतोय.
धमक्यांवर काय म्हणाला होता सलमान खान?
सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्यांंतर सलमान खान कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत फिरतो. नुकताच तो त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत व्यक्त झाला होता. “देवा, अल्लाह सर्वांपेक्षा वर असून माझे आयुष्य जेवढे लिहिलेले आहे तेवढेच आहे बस्स.” असे सलमान म्हणाला होता.