Couple Cheats 55 Lakhs By Pretending Eknath Shinde PA : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा वापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी या दाम्पत्याने स्वतःला शिंदे यांचे ‘स्वीय सहाय्यक’ असल्याचे भासवून 18 ते 20 नागरिकांना शासकीय नोकरी व घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
बनावट कागदपत्रांची निर्मिती
फसवणुकीसाठी या दाम्पत्याने बनावट ओळखपत्र, लेटरहेड आणि अपॉइंटमेंट लेटर तयार करून पीडितांना दाखवले. विशेषतः रेल्वेतील नोकरी आणि म्हाडाच्या फ्लॅटसाठी नागरिकांना प्रलोभन देण्यात (Crime News) आले. नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत हा गंडा घालण्यात आला. एका पीडित हर्षल शालिग्राम बारी यांच्याकडून 13.38 लाख रुपये, तर इतर पीडितांकडून मिळून आणखी 42.22 लाख रुपये उकळण्यात (Jalgaon News) आले. हा व्यवहार जळगावमधील कालिका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये पार पडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
9 महिन्यांत लाखोंची उकळपट्टी
दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही नोकरी किंवा घर न मिळाल्याने पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’! नाटकाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या हस्ते प्रदर्शित
नाशिकमध्येही अशाच प्रकारची फसवणूक
दरम्यान, नाशिकच्या निफाड तालुक्यातील औरंगपूर येथे 19 वर्षीय युवतीकडून 4.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याने मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी जवळीक असल्याचे भासवून युवतीला पोलीस दलात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
Latur Crime : शेती विकण्यावरून वाद! मुलाने केला आईचा गळा आवळून खून, नंतर स्वत:ला संपवलं
पीडितेची आई वारंवार आश्वासन देऊनही काहीच काम न झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल झाली. आरोपीला अटक करून निफाड न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.